signup & get ₹ 8,500 Free

१३ पानी भारतीय रमी खेळण्याचे नियम

Please enable your location. If already enabled then please wait till we fetch your location.
How to Play Rummy

१३ पानी भारतीय रमी खेळण्याचे नियम

पत्त्यांचा योग्य क्रम लावून त्याचे संच करणे हे या खेळाचे ध्येय आहे. जिंकण्या साठी खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांच्या आधी डाव घोषित करून आणि पत्त्यांची योग्य क्रमात मांडणी करावी लागते.हा खेळ ५२ पत्त्यांच्या २ कॅट सह तसेच प्रत्येकी दोन जोकर पानांसह खेळला जातो

जोकर

Rummy Joker Card

बंद कॅट च्या खालच्या बाजूला असलेल्या उपड्या पानाच्या सामान श्रेणीतील इतर सर्व पाने जोकर समजली जातात. जोकर बाकीच्या पानांचे प्रर्यायी पान म्हणून काम करते

अनुक्रम

एका संचात एकाच रंगाची तीन किंवा जास्त पाने अनुक्रमात लावलेली असतात

शुद्ध अनुक्रम जोकर विरहित संच
अशुद्ध अनुक्रम जोकर सहित संच
पहिला संच : पहिला संच हा शुद्ध अनुक्रम असतो
दुसरा संच : दुसरा संच हा दुसरा शुद्ध अनुक्रम किंवा पहिला अशुद्ध अनुक्रम असतो

नोंद : जोपर्यंत तुमचा पहिला संच तयार होत नाही तो पर्यंत तुमचा दुसरा संच अवैध असतो

Rummy Cards Sequence

संच

समान मूल्यांची पण वेगळ्या रंगाची ३ किंवा ४ पाने मिळून संच तयार होतो.संचा मध्ये जोकर पण समाविष्ट केला जाऊ शकतो .

Rummy Card Sets

नोंद : जोपर्यंत तुमच्या कडे पहिले दोन अनुक्रम उपलब्ध नसतात तो पर्यंत संच अवैध मनाला जातो

अनुक्रम कसा लावावा ?

ज्या पानांचा क्रम लावावयाचा आहे त्या पानावर स्पर्श करा .ग्रुप हे बटन दाबा नाहीतर तुमच्या पसंतीची पाने हलवून स्वतः क्रम लावा

How to Group Rummy Card Game

कसे मिसळाल ?

जे पान अनुक्रमात मिसळायचं आहे त्या पानाला स्पर्श करा 'इथे मिसळा' या पर्यायावर स्पर्श करून तुमच्या आवडीच्या अनुक्रमात मिसळा नाहीतर ते पान हलवून योग्य अनुक्रमात मिसळा

How to Add Rummy Card Game

पान कसे टाकाल ?

जे पान टाकायचे आहे त्या पानाला स्पर्श करा 'टाकून द्या' या बटणावर स्पर्श करा नाहीतर जे पान टाकून द्यायचे आहे ते पान हलवून जिथे उपडी पाने आहेत तिथपर्यंत ओढत नेवून सोडा

How to Discard Rummy Card Game

एकूण गुण

एकूण गुण म्हणजे जी पाने वैध अनुक्रम तसेच वैध संचाचा भाग नाहीत अश्या पानांच्या मूल्यांची एकूण बेरीज होय योग्य अनुक्रम आणि योग्य संच जुळवून हातातले गुण शून्यापर्यंत कमी करणे हे या खेळाचे ध्येय आहे

Rummy Card Points

गुलाम , राणी , राजा आणि एक्का यांचे प्रत्येकी मूल्य 10

बाकीच्या पानांचे मूल्य हे त्यांच्या क्रमानुसार आहे .एकूण गुण म्हणजे जी पाने वैध अनुक्रम तसेच वैध संचाचा भाग नाहीत अश्या पानांच्या मूल्यांची एकूण बेरीज होय

Rummy Card Points

डाव घोषित कसा कराल ?

सगळी १३ पाने योग्य अनुक्रमात तसेच योग्य संचात लावली आहेत याची खात्री करा .वैध घोषणे साठी कमीत कमी एक तरी शुद्ध अनुक्रम गरजेचा आहे निरुपयोगी पान निवडून टाकून द्या या पर्यायाच्या ऐवजी शो हा पर्याय निवडा

Rummy Valid Declaration

SHOWउजव्या बाजूला खाली असणाऱ्या घोषित करा या बटणावर स्पर्श करा

१३ पानी रमी म्हणजे काय?

१३ पानी रमी खेळण्यासाठी १ पत्त्याचा जोकारांसमवेत असंलेला कॅट तसेच २ खेळाडू असणे गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूला सिक्वेन्स बनविण्यासाठी १३ पत्ते मिळतात. १३ पानी रमी हा भारतात साधारण खेळाला जाणारा असा रमीचा प्रकार आहे आणि या खेळात नैपुण्य मिळवण्यासाठी बऱ्याच सरावाची गरज भासते.

रमी आणि ती खेळण्याचे अधिकृत नियम

रमी पत्त्यांच्या उपलब्ध प्रकारांमध्ये रमी हा सर्वात लोकप्रिय पत्त्यांचा प्रकार आहे. रमीच्या बाकी उपलब्ध प्रकारांमध्ये १३ पानी रमी भारतात सर्वात जास्त प्रमाणात खेळली जाते. रमीच्या प्रत्येक डावाचा मूळ उद्देश हातातील पानांचा योग्य वापर करून नियमाप्रमाणे सिक्वेन्स बनवणे हा आहे.

साधारणतः भारतात रमी २ ते ६ जणांमध्ये खेळली जाते जिथे प्रत्येक खेळाडू हातातील १३ पत्त्यांचा रमीच्या नियमानुसार सिक्वेन्स जुळेपर्यंत आपापल्या पाळीनुसार ठेवलेल्या कॅट मधून पत्ता उचलत आणि टाकत राहतो. या साईटवर तुम्हाला रमीचे ९ वेगवेगळे प्रकार खेळवयास मिळतील.

सर्वसाधारण भारतीय रमीचे अधिकृत नियम

 • १. भारतीय रमी सर्वसाधारणपणे पत्त्यांचे २ कॅट आणि दोन जोकर वापरून खेळली जाते.
 • २. प्रत्येक प्रकारातील पत्ते त्यांच्या गुणांनुसार चढत्या क्रमाने पुढील प्रमाणे: एक्का, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, गुलाम, राणी आणि राजा.
 • ३. सिक्वेन्स बनवताना एक्का १ किंवा फेस कार्ड म्हणून वापरला जाऊ शकतो.
 • ४. पत्त्यांचे गुण पुढील प्रमाणे: फेस कार्ड (राजा , राणी , गुलाम ) - १० गुण प्रत्येकी एक्का - १० गुण.

रमी खेळणे कायदेशीर आहे का ?

ऑगस्ट २०१५ ला माननीय सुप्रीम कोर्टाने ऑनलाईन रमी या खेळाला कौशल्याचा खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे आणि म्हणूनच हा खेळ कायदेशीर मनाला जातो कारण हा खेळ तुम्हाला तुमचे कौशल्य वापरून जिंकायची संधी देतो.

रमीच्या खेळात तुम्ही पत्ता कसा घ्याल आणि टाकाल ? (१३ पानी रमीचे नियम)

प्रत्येक पाळीच्या वेळी खेळाडू त्याच्या आधीच्या खेळाडूने टाकलेले किंवा समोर ठेवलेल्या बंद कॅट मधून पानं घेऊ शकतो आणि त्याला नको असेलेले पान टाकू शकतो आणि जर रमीच्या नियमानुसार त्याचे सर्व सिक्वेन्स जुळले असतील तर हातातील १४ वे पानं झाकून बाकी १३ पानांचे वैध सिक्वेन्स दाखवून जिंकू शकतो.

जर मला वाटत असेल कि खेळ पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे चांगली पाने आलेली नाहीत तर काय करावे?

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमच्या हातातील पाने चांगली नाहीत तर तुम्ही तुमचा डाव सोडू शकता. तुम्ही तुमचा डाव तेंव्हाच सोडू शकता जेंव्हा तुमची पाळी येईल आणि तुम्ही कुठलाही पत्ता उचललेला नसेल. काही पूल रमीचे प्रकार तुम्हाला अर्ध्यावर डाव सोडण्याची अनुमती देतात पण त्या वेळी दंडात्मक गुण हे तुम्ही खेळाच्या सुरवातीला कोठलेही पान उचलायच्या आधी सोडलेल्या डावपेक्षा जास्त असतात. तसेच तुम्ही बेस्ट ऑफ ३ आणि २ डील खेळाच्या प्रकारात तुमचा डाव तुम्ही सोडू शकत नाही.
 • टीप: १०१ गुणांच्या पूल प्रकारासाठी:
  • १. एकही पान उचलायच्या आधी डाव सोडल्याचे गुण : २०
  • २. एक किंवा जास्त पाने उचलल्या नंतर डाव सोडल्याचे गुण : ४०

  २०१ गुणांच्या पूल प्रकारासाठी :

  १. एकही पान उचलायच्या आधी डाव सोडल्याचे गुण : २५

  २. एक किंवा जास्त पाने उचलल्या नंतर डाव सोडल्याचे गुण : ५०

जोकर पान काय असते आणि ते भारतीय रमी खेळण्यासाठी कसे उपयोगी पडते ?

एक पान जे बाकीच्या खेळाडूंना पाने वाटून झाल्या नंतर वेगळे काढून ठेवले जाते ते पान त्या डावापुरते जोकर पान मानले जाते. त्याच प्रकारची वेगळ्या रंगाची सर्व पाने त्या डावापुरती जोकर पाने मानली जातात. त्या व्यतिरिक्त जोकाराचे चिन्ह असलेली दोन ज्यादा पाने सुद्धा जोकर म्हणून वापरली जातात.

कुठल्याही प्रकारचा सिक्वेन्स पूर्ण करण्यासाठी जोकर पानाचा वापर केला जाऊ शकतो. एक सिक्वेन्स जोकर पानाशिवाय पूर्ण केल्यानंतरच बाकीच्या सिक्वेन्स साठी खेळाडू जोकर पानाचा उपयोग करू शकतो. जोकर पानाचा योग्य वापर कसा करावा हे तुम्ही ऑनलाईन बघू शकता.

जर जोकाराचे चिन्ह असलेलेच पान जोकर म्हणून निवड्ले गेले तर काय होते?

जर जोकाराचे चिन्ह असलेलेच पान जोकर म्हणून आले तर एक्का (A) हे पान जोकर म्हणून ग्राह्य मानण्यात येते.

तुम्ही कधी जिंकता किंवा तुम्ही कधी शो करू शकता ?

तुम्ही तेंव्हा जिंकता जेंव्हा तुम्ही शो म्हणून तुमची पाने योग्य सिक्वेन्स जमवून प्रतिस्पर्ध्यासमोर उघड करता. खेळाडू तेंव्हाच शो म्हणू शकतो जेंव्हा त्याच्या हातातील सर्व १३ पाने रमीच्या नियमानुसार योग्य सिक्वेन्स मध्ये असतील. शो करण्यासाठी खेळाडू कडे एकूण मिळून १४ पाने असावी लागतात. १४ वे पान जे असते ते पान झाकून खेळाडू शो म्हणू शकतो. शो म्हणाल्यानंतर खेळाडूला हातातील इतर १३ पाने रमीच्या नियमानुसार सिक्वेन्समध्ये लावून मगच इतर खेळाडूंसमोर पडताळणी साठी उघड करावी लागतात. खेळाडूने शो म्हणून पाने उघड केल्यानंतर त्याला विजेता तेंव्हा घोषित केले जाते जेंव्हा त्याचे सिक्वेन्स पुढील प्रमाणे असतात :

 • पहिला सिक्वेन्स : पहिल्या सिक्वेन्स मध्ये तीन किंवा जास्त पाने एकाच प्रकारची (एकाच रंगाची) आणि योग्य क्रमाने लावलेली असावी लागतात. पहिल्या सिक्वेन्स मध्ये जोकर पान वापरले जाऊ शकत नाही. पण खेळाडू जोकर पान तेंव्हाच वापरू शकतो जेंव्हा ते पान जोकर म्हणून न वापरता साधारण पान म्हणून क्रम लावण्यासाठी वापरले जाते. Rummy Card Games
 • सिक्वेन्स २: दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये एकाच प्रकारची (एकाच रंगाची) तीन किंवा जास्त पाने योग्य क्रमाने असावी लागतात. दुसऱ्या सिक्वेन्स जोकर वापरून किंवा न वापरता जुळवला जाऊ शकतो. Rummy Games
 • क्वेन्स ३ आणि ४: तिसऱ्या आणि चौथ्या सिक्वेन्स मध्ये योग्य क्रम किंवा ट्रीपलेट असू शकते. तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या सिक्वेन्स मध्ये जोकर पान वापरू शकता 13 Cards Rummy

शो करण्याचा विशेष प्रकार:

खेळाच्या वेळी जर तुमच्या कडे एक प्युअर सिक्वेन्स , दुसरा सिक्वेन्स जोकर सहित किंवा विरहित असेल आणि तिसऱ्या सिक्वेन्स मध्ये ट्रीपलेट बनवण्यासाठीची दोन पाने असतील तर तुम्ही जास्तीत जास्त २ जोकर वापरून ट्रीपलेट पूर्ण करू शकता कारण ट्रीपलेट प्रकारच्या सिक्वेन्स मध्ये जास्तीत जास्त चारच पाने असू शकतात. जर तुमच्या कडे एक ज्यादाचा जोकर रहात असेल तर तो जोकर वेगळा ठेवावा कारण ५ पानांचे ट्रीपलेट वैध मानले जात नाही.

रमी सिक्वेन्स बनवण्यासाठीचे खालील उदाहरण सिक्वेन्स बनवण्याची पद्धत अजून स्पष्ट करतील.

जर तुमच्या कडे प्युअर सिक्वेन्स असेल जसे कि बदाम १०, गुलाम , राणी आणि राजा,

दुसरा सिक्वेन्स असेल इस्पीकचा एक्का, २, ३ , ४

आणि उरलेली पाने किल्वर १० चौकट १० आणि दोन चित्राचे जोकर आणि एक जोकर चिन्ह असलेला जोकर असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही किल्वर १० झाकून पहिला प्युअर सिक्वेन्स :बदाम १०, गुलाम, राणी , राजा, दुसरा सिक्वेन्स : इस्पिक एक्का, २,३,४ आणि तिसरा सिक्वेन्स चौकट १० आणि दोन चित्र जोकर आणि जोकर चिन्ह असलेला जोकर वेगळा ठेवून शो दाखवू शकता. असा शो वैध मनाला जातो.

चार पानांपेक्षा जास्तच सिक्वेन्स बनवू नका.

 • काय आहे रिजॉईनचा पर्याय ?

  खेळाडूने जर खेळताना जास्तीत जास्त गुणांची मर्यादा ओलांडली तर खेळाडू रिजॉईनचा पर्याय निवडू शकतो.

 • खेळाडू रिजॉईन हा पर्याय कधी निवडू शकतो ?

  जर इतर खेळाडूंचे गुण २०१ या प्रकारच्या खेळात १७४ पेक्षा कमी असतील किंवा १०१ या प्रकारात ७९ पेक्षा कमी असतील तर गुणमर्यादा ओलांडलेला खेळाडू रिजॉईन हा पर्याय वापरून आपला खेळ पुन्हा सुरु करू शकतो. हा पर्याय वापरण्यासाठी खेळाडूला त्या खेळासाठी लागणारी रक्कम परत भरावी लागते.

 • ऑटो-प्ले नियम
 • १. जर तुम्हाला नेटवर्क खंडित होईल अशी भीती असेल तर आता घाबरायचे कारण नाही कारण आता तुम्ही नेटवर्क खंडित झाल्यानंतरही खेळ सुरु ठेऊ शकता
 • २. आम्हाला माहित आहे जिंकत आलेल्या डावाच्या दरम्यान नेटवर्क खंडित होणे हा भयंकर अनुभव आहे आणि तुम्ही हा अनुभव कधीही घेऊ इच्छित नाही.
 • ३. म्हणूनच क्लासिक रमी घेऊन आली आहे ऑटो-प्ले चा पर्याय. ज्या योगे तुम्ही इंटरनेट सेवा खंडित झाल्यावरही डाव पुढे सुरु ठेऊ शकता.
 • ४. ज्या क्षणी तुमचे नेट खंडित होईल त्या क्षणापासून ऑटो-प्ले हा पर्याय त्या डावासाठी सक्रिय केला जातो. याचाच अर्थ तुमचा डाव तुम्ही प्रत्यक्ष खेळत नसून सुद्धा पूर्ण केला जातो.
 • ५. ऑटो-प्ले मध्ये समोरच्या कॅट मधून एक पत्ता उचलला जातो आणि तोच परत टाकला जातो. ह्यामुळे तुम्हाला परत नेट सुरु झाल्यानंतर डाव सुरु ठेवण्याची एक संधी मिळते.
 • ६. ऑटो-प्ले च्या दरम्यान जर तुमच्या सोबत खेळणाऱ्या दुसऱ्या खेळाडूने शो केला तर तुम्हाला फुल काउन्ट म्हणजे ८० गुण प्रदान केले जातात. पुढचा डाव सुरु होऊनसुद्धा तुम्ही परत कनेक्ट झाला नाहीत तर तुम्हाला ऑटो-ड्रॉप केले जाते जेणेकरून तुम्हाला परत फुल काउन्ट मिळणार नाही याची दक्षता घेतली जाते .
 • ७. ऑटो-प्ले पर्याय तेंव्हाच सुरु केला जातो जेंव्हा खेळाडूने डिस्कनेक्ट होण्याआधी कमीतकमी एकदातरी पत्ता उचलला असेल.
  टीप :

  * १. चुकीच्या शो साठी मिळणारे जास्तीत जास्त दंडात्मक गुण : ८०

  * २. आम्ही एकापेक्षा जास्त अकाउंट काढण्याची परवानगी देत नाही. एका खेळाडूसाठी फक्त एकच अकाउंट उघडण्याची परवानगी आहे.

इतर भाषांमध्ये रम्मी कसे खेळायचे: