जिंकण्यासाठी रम्मी टिपा आणि युक्त्या

Rummy Tips and Tricks
भारतीय रम्मी खेळासाठी टिपा आणि युक्त्या

13 पत्ते रम्मी कसे जिंकायचे याबद्दल टिपा

आपला 13 पत्त्यांचा रम्मी खेळ अधिक चांगला बनविण्याचे मार्ग आपण शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहात. हकीगत अशी आहे की आपण जितके जास्त खेळता तितके आपण खेळात चांगले बनता. पण आमच्या टिपांमुळे आपल्याला इतर सर्व खेळाडूंपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत होईल. अधिक जिंकण्यासाठी अधिक चांगले खेळा!

प्रत्येक वेळी रम्मी खेळात जिंकण्याचे तंत्र:

 • आपले प्राधान्यक्रम योग्य ठेवा आणि याचा अर्थ असा आहे की शुद्ध रन महत्वाचे आहे. आपल्याला हे मिळाल्यावर,इतर गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास सुरवात करता येईल.
 • इतर खेळाडू काय करत आहेत याबाबतीत दक्ष आणि सतर्क रहा. इतर खेळाडू उघड्या पत्त्यांच्या ढिगात काय टाकून देतात आणि काय निवडतात हे आपल्याला त्यांच्या खेळाबद्दल चांगली कल्पना देईल. अशा प्रकारे आपल्याला नेहमीच राखून ठेवण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी योग्य पत्ता माहित असतो
 • नेहमी प्रयत्न करा आणि उच्च गुण असलेले पत्ते काढून मोकळे करा. हे असे सुनिश्चित करण्यासाठी आहे की जर एखाद्या प्रतिस्पर्ध्याने आपण करण्यापूर्वी एखादा शो केला, तर आपले डेडवुड पॉईंट्स कमी होतील.
 • लक्षात असू द्या की एका रनमध्ये 3 पेक्षा जास्त पत्ते असू शकतात. हे वास्तव अनेक खेळाडूंना माहीत नसते.
 • नेहमी स्मार्ट पत्ते शोधा आणि गोळा करा. सहजपणे रनमध्ये विलीन करता येतील असे हे पत्ते असतात. उदाहरणार्थ, कोणत्याही सूट मधील 7 ला समान सूटच्या 5 आणि 6 सोबत एकत्र करता येते आणि त्याच सूटच्या 8 आणि 9 सह देखील काम करता येईल.
 • रम्मीच्या खेळात जोकर महत्त्वाचा असून आपल्या खेळात जोकरचा उत्तम वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे. उच्च पॉइंट मूल्याचे रन किंवा संच पूर्ण करण्यासाठी नेहमी जोकरच्या पत्त्याचा उपयोग करा. आणखी एक गोष्ट म्हणजे नैसर्गिक रनमध्ये जोकरचा वापर न करण्याचा प्रयत्न करणे.
 • एखाद्या विशिष्ट पत्त्याची अथकपणे वाट पाहणे जेणेकरून रनचा मेळ बसेल, ही एक शहाणपणाची गोष्ट नाही. आपण सतत आपल्या पत्त्यांकडे पाहण्याची आणि बदल करण्यासाठी त्यांचा पुन्हा पुन्हा आढावा घेत राहण्याची गरज आहे
 • आपण आपले पत्ते नीट आणि अशा पद्धतीने लावा की खेळणे सोपे होईल. ते करण्याचा एक मार्ग म्हणजे एकामागे दूसरा रंग लावणे. असे केल्याने जेव्हा पत्त्यांचा फायदा उचलण्याची किंवा ते टाकून देण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला गोंधळायला होणार नाही.
 • पत्ते जास्त वेळ सांभाळून ठेवू नका. स्मार्ट गोष्ट म्हणजे शक्य तितक्या लवकर वापरले जात नसलेले पत्ते टाकून देणे सुरू ठेवणे, खास करून जर त्यांच्या पॉईंट्सचे मूल्य जास्त असेल.

रम्मीमध्ये जिंकण्याच्या युक्त्या

आपल्या सर्वांना माहित आहे की रम्मीमध्ये जिंकणे म्हणजे खेळण्याची कौशल्ये विकसित करणे होय. ऑनलाइन भारतीय रम्मी खेळण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये आपल्या पत्त्यांचा आढावा घेण्याचे कौशल्य आणि त्यांचा सर्वोत्तम फायद्यासाठी वापर करणे आणि आपले विरोधक काय करीत आहेत याची जाणीव असणे यांचा सुद्धा समावेश आहे. एक चांगला विरोधक सुद्धा तेच काम करेल याबाबतीत आपण निश्चिंत रहावे. खालीलपैकी काही युक्त्या वापरून आपल्याला त्याला/तिला/त्यांना फसवता येईल:

 • एका अनुक्रमासाठी उघड्या ढिगातून पत्ते घेत असताना, आपण आपल्या खेळाबद्दल आपल्या प्रतिस्पर्ध्यासाठी / प्रतिस्पर्ध्यांसाठी एक संकेत सोडत आहात या वस्तुस्थितीची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आपण त्यांना अनुक्रमाचा भाग असलेला एखादा पत्ता (जे आपल्याकडे दोन असतील) फेकून गोंधळात टाकू शकता.
 • आपल्याला आवश्यक असलेले पत्ते देण्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याला फसवता येईल. आपण सेट तयार करताना पत्ते शोधत असाल तेव्हा हे काम करता येईल. उदाहरणार्थ, आपण तीन जॅक पत्त्यांचा एक संच तयार करीत आहात आणि आपल्याकडे बदामाचा आणि किल्वरचे जॅक आहे, मग इस्पिकच्या राणीला टाकून दिल्यास आपला प्रतिस्पर्धी गोंधळात पडेल जो कदाचित इस्पिकचा जॅक टाकून देईल आणि तो आपल्याला हवा आहेच! दिशाभूल करण्याच्या आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्याला हवे असलेले पत्ते टाकण्यास लावण्याच्या या प्रक्रियेस आमिष दाखवणे आणि मासा पकडणे असे म्हणतात.

*वर दिलेल्या पत्त्यांच्या खेळाच्या टिपा आणि युक्त्या किंवा रणनीतीचा मार्गदर्शक तत्त्वे म्हणून वापर करायचा आहे आणि आपण खेळ जिंकाल असे वचन देत नाही. क्लासिक रम्मी या टिपांचे अनुसरण केल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांची कोणतीही जबाबदारी घेत नाही.